स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-पिंपरी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपार कष्टाने गोरगरीब, बहुजन वर्गाला शिक्षणाची दारे खुली झाली मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवले होते .त्यांच्याशी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करुन बहुजनांची गुलामगिरीतून मुक्तता केली.अशा बहुजनांचे आदरास्थान असणार्या महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन मनोवादी प्रवृत्तीला समर्थन दिले आहे.त्यांनी त्वरित या महापुरुषांची माफी मागावी अन्यथा पिंपरी चिंचवड शहरात त्यांना पाऊल ठेवू देणार नसल्याचा संतापजनक इशारा संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतिष काळे यांनी दिली.
सतीश काळे यांनी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व आंबेडकर यांनी भीक मागून शाळा चालविल्या असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.हे वक्तव्य मनुवादी प्रवृत्तीच्या विचारांचे असल्याचे दिसून येते त्यामुळे बहुजन वर्गातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या संतापजनक भावना निर्माण करणारे आहे.गेल्या अनेक दिवसांपासून भाजपाचे पदाधिकारी नेतेमंडळी यांना सत्तेचि मग्रुरी आलेली आहे.त्यामुळे बेताल वक्तव्य केले जात आहे.त्यांना संभाजी ब्रिगेड जशास तसे उत्तर देणार आहे.पालकमंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत.त्यांनी महात्मा फुले यांच्या पुणे नगरित पाऊल ठेवताना आधी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागावी.केवळ माफी न मागता भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्यांची जागा दाखवून पुण्याच्या पालकमंत्री पदावरून पायउतार करावे अन्यथा पिंपरी चिंचवड शहरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा नियोजित कार्यक्रम उधळून लावू अशा इशारा सतीश काळे यांनी दिली.याला सर्वस्वी जबाबदार भाजपा पदाधिकारी असतिल असेही काळे म्हणाले.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









