www.starmazanews.comपुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:-चिंचवड राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे.त्यातच राजकीय मंडळींकडून वादग्रस्त विधानाचे सत्र सुरू आहे.या सर्वादरम्यान काल भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.या विधानांमुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.त्यांनतर आज देखील या विधानाचे पडसाद आज सर्वत्र दिसून आले.दरम्यान , पुणे दौर्यावर असताना पिंपरी चिंचवड येथे भाजपा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.ही शाईफेक कोणत्या संघटनेकडून करण्यात आली हे स्पष्ट झालेले नाही.
आज चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसावी महोत्सवासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते.ते आपल्या एका कार्यकर्त्याच्या घरुन निघाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










