स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
प्रतिनिधी / जागतिक अपंग दिन व तीन डिसेंबर ते दहा डिसेंबर यादरम्यान अपंग सप्ताह निमित्त आनाळा ग्रामपंचायत च्या वतीने ५ टक्के निधीतुन आनाळा येथील अपंग बांधवांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले यावेळी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आंबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषजी खांडेकर , आनाळा नगरीच्या सरपंच सौ अंबिका क्षीरसागर यांच्या हस्ते आनाळा येथील 30 अपंग बांधवांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले यावेळी आनाळा नगरीचे भूमिपुत्र व सैन्य दलामध्ये ३० वर्षे 24 दिवस सेवा करून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र गणपती शिंदे यांचा आनाळा ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच यावेळी कार्ला गावचे सुपुत्र मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विनोद शिंदे यांची पीएसआय पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचाही सन्मान आनाळा ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला .
यावेळी ज्योतीराम क्षीरसागर, उपसरपंच कल्याण शिंदे ,ग्रामपंचायत सदस्य अजित शिंदे, चांगदेव चव्हाण, अशोक शिंदे ,विनोद कदम, दादासाहेब फराटे, सीमा अंकुश, परंडा तालुका दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके तालुका सचिव पांडुरंग मिसाळ पत्रकार निशिकांत क्षिरसागर, यांच्यासह प्रगतशील शेतकरी बिबीशन आप्पा शिंदे भाऊसाहेब क्षिरसागर, रेवन्नाथ शिंदे ,हनुमंत जाधव, साजिद शेख, मुकुंद रीटे, ग्रामसेवक विठ्ठल गोसकेवार साहेब, दादा चव्हाण, समाधान गोडसे, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी धनंजय सावंत पुढे बोलताना म्हणाले की दिव्यांगासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणारी आनाळा ही ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असून आनाळा येथील तसेच तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अपंगाच्या कोणत्याही प्रश्नासाठी मंत्री महोदय डॉ.तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातुन सदैव उपलब्ध असेल महाराष्ट्र शासन व या सध्याच्या सरकारने विशेष अपंग मंत्रालय स्थापन केल्यामुळे आनाळा ग्रामस्थ व ग्रामपंचायत व बांधवांच्या वतीने शासनाचे विशेष आभार मानण्यात आले.यावेळी विठ्ठल क्षिरसागर, विष्णु क्षिरसागर, समाधान पन्हाळे, राजेंद्र पुरदंरे, यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपसस्थित होते…
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.