रिव्हर सायक्लोथॉन ची,इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद.

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.comपुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर

पिंपरी चिंचवड :-इंद्रायणी नदी संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या ऐतिहासिक रिव्हर सायक्लोथॉन मध्ये नोंद झाली आहे. ही तमाम पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे. अशी माहीती अविरत श्रमदान संस्थेचे डॉ निलेश लोंढे यांनी दिला. भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र यासारख्या अनेक पर्यावरण प्रेमी संस्था, संघटनांच्या पुढाकाराने पिंपरी चिंचवडमध्ये रिव्हर सायक्लोथॉन २०२२चे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आँनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील सुमारे २० हजारहून अधीक सायकल स्वरांनी ???? रजिस्ट्रेशन केले होते. तसेच, प्रत्यक्षपणे ३हजाराहून अधीक सायकलपटू सहभागी झाले होते. त्यामुळे सुमारे २५ हजार पर्यावरण प्रेमी नागरीकांच्या उपस्थित ऐतिहासिक “रिव्हर सायक्लोथॉन ” पार पडली असे डॉ.निलेश लोंढे यांनी सांगितले.
यावेळी सिने अभिनेता प्रविण तरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!