संतोषी माता चौक नेहरु नगर पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया

Picture of starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:- पुणे प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी चिंचवड :-पिंपरी,नेहरुनगर येथील संतोषी माता चौकात महापालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. या भागातील नागरिकांना आज दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही .त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.मागिल तीन वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. नागरिकांना दिवसातुन एकवेळेसच पाणीपुरवठा होत आहे. एक दिवसाआड होणार्या पुरवढ्यामुळे नागरिकांच्या तक्रार असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडि झाली आहे. नेहरुनगर येथील पाईपलाईनचा व्हाल तुटला.सासंकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. पाईपलाईन फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणात वाया गेले रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे.
कार्यकारी अभियंता रामनाथ टकले म्हणाले वाल तूटला आहे .तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. दोन तासामध्ये काम पुर्ण होईल .
स्थानिक नागरिक समिर पाटील म्हणाले ,नेहरुनगर परिसरात आज दिवसभर पाणी पुरवठा झाला नाही .त्यामुळे नागरिकांचे हाल झालेले आहे. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती करावी व या भागाला जास्त वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!