www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने / शहाजी चंदनशिवे
दि. 1 डिसेंबर 2022 रोजी मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. विश्वेश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. सुनिल जाधव व डॉ अंकुश पवार सर यांनी प्रभातफेरीचे उदघाटन केले. ” आपली एकता,आपली समानता – एचआयव्ही सह जगणाऱ्याकरिता ” या घोष वाक्याच्या अनुशंगाने
रा. गे शिंदे महाविद्यालय व उप जिल्हा रुग्णालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब चे विद्यार्थी सहभागी झाले होते.





मुलांनी आचरणा बरोबर संस्कारक्षम आयुष्य जगावे असे प्रतिपादन प्रा डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर एच आय व्ही एड़स साठी प्रतिबंधात्मक उपचार आहेत असे प्रतिपादन आयसीटीसी समुपदेशक श्री. मकरंद वांबुरकर यांनी मांडले प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. रविन्द्र करपे यांनी विदद्यार्थीना शपथ दिली, या वेळी रुग्णालयातील बापु खताळ,आरोग्य सेवक विक्रम वाघ, तानाजी गुंजाळ,अजय जाधव आर पी. जी फाउंडेशन ,सुधिर मस्के,बाबुराव मुळीक, मिलींद बनसोडे, अधिपरिचारिका श्रीमती कुलकर्णी सुनिता, श्रीमती जयश्री लावंड, रुपाली सौताडेकर, आऊबाई थिटे, मनिषा दुधकवडे, तसेच महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे सर, पर्यवेक्षक प्रा. मांगले दतात्रय, प्रा.राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख, प्रा. अमर गोरे पाटील, प्रा. ज्योतिबा शिंदे, प्रा. संतोष भिसे, प्रा. विलास गायकवाड सर, प्रा. उत्तम कोकाटे सर, यांच्या सह उप जिल्हा रूग्णालय कर्मचारी व रा गे शिंदे महाविद्यालय येथील शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









