मौजे बावी (आ) दत्त मठ, याठिकाणी पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

मौजे बावी (आ) दत्त मठ, याठिकाणी झालेल्या पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून
“श्री योगिराज विजय” हा ग्रंथ फुरसुंगी येथील आदी योगी, ज्यांनी हा दत्त सांप्रदाय स्थापन करून महाराष्ट्रभर त्याचा विस्तार केला, अनेक भाविक भक्त वारकरी त्याच्या या मार्गात येऊन परमार्थिक उपासनेचा आस्वाद आनंद घेत नामस्मरणाच्या माध्येमातून भगवान दत्तात्रायच्या चरणी लीन झाले ते योगिराज महाराज पवार यांच्यावर त्यांच्या जीवनाचा सारांश पद्धतीने ओविबद्ध केलेला सुंदर आणि सुरेख असा हा ग्रंथ बावीचे मठाधिपती श्री धोंडीराज महाराज (श्रीखंडे मामा) यांनी त्यांच्या लेखणी मधून साधक आणि वाचका पर्यंत पोहचविण्याच काम 11नोव्हे ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या वेळी सांप्रादयातील लोकांना उपलब्ध करून दिला. या ग्रंथाचे प्रकाशन ह भ प गुरूवर्य जयवंत महाराज बोधले यांच्या शुभहस्ते करण्यात आल तसेच त्या दिवशीची हरी किर्तन सेवा त्यानीच केली,

सप्ताहाच्या पाहिल्या दिवशीच समाज प्रबोधनकार ह भ प निवृती महाराज देशमुख ( इंदुरिकर) यांच्या कीर्तनाने सुरुवात झाली. 13 नोव्हेबर रोजी योगीराज महाराज यांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक गुरूवर्य ह भ प आंबऋषी तात्या पाटील यांच्या वारकरी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून पार पडली. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वा, दत्त महाराज जाधव यांच्या शुभहस्ते ह भ प नागनाथ महाराज होनकोंबडे (कोळी) यांच्या पौरोहित्यात शास्त्रयुक्त पद्धतीने योगिराज महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. तसेच काल्याची हरी किर्तन सेवा भागवताचार्य सुप्रसिध्द गायनाचार्य ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज पाटील यानी या पाच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता केली.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!