सावकारी वसुली बंद करा, निर्णय तत्काळ मागे घ्या.’ “खासदार श्रीरंग बारणे”

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.comपुणे विभाग प्रतिनिधी नामदेव मेहेर


पिंपरी चिंचवड:-शहरातिल मालमत्ता कर थकलेल्या नागरिकांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, उचलुन महापालिकेने सावकारी वसुली करु नये. एवढे वर्ष झोपी गेलेले प्रशासन अचानक जागे झाले आणी लोकांच्या घरातील सामान उचलण्याची भाषा करु लागले हे अतिशय खेदजनक ,अवमानकारक आहे. नागरिकांना नाहक त्रास देऊ नका आडमुठेपणाचा निर्णय तात्काळ मागे घ्याण्याची सुचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केलि आहे. पालिकेच्या कर वसुलीला कोणताही विरोध नाही करवसुलि करण्याची पद्धतीला विरोध आहे .घरातील साहीत उचलुन आणणे हा पर्याय होवू शकत नाही.त्यासाठी आनेक पर्याय आहेत आसे खासदार बारणे म्हणाले.याबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त तथा प्रशासन शेखर सिंह यांना पत्राद्वारे सुचना दिल्या आहेत. निवेदनात बारणे यांनी म्हटले आहे की, ज्या निवाशी मालमत्ता मध्ये नागरिक वास्तव्य करतात,अशा थकबाकीदारांकडे 5 किंवा 10 वर्षापासून थकबाकी आहे. आशा निवासी मालमत्ताची जंगम मालमत्ता म्हणजे कार,फ्रिज, टीव्ही आदी महत्वाची वस्तू जप्त करण्याची धडक कारवाई महापालिकेमार्फत याच आठवड्यात करण्यात येणार असल्याची प्रशासनाने जाहीर केले आहे शास्तीकर आणि करोणा महामारिच्या कालावधीत जास्त आहे. थकीत कर वसुलीसाठी लोकांच्या घरातील घरगुती वस्तू जप्त करण्याचा फतवा चूकीचा आहे शास्तीकराबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. त्यामुळे आयुक्तानि कर वसुलीसाठी कोणत्याही प्रकारची अतिघाई करु नये .नागरिकांना नाहक त्रास देवु नये असे खासदार बारणे म्हणाले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!