स्टार माझा न्यूज:- पुणे विभाग प्रतिनिधी नामदेव मेहेर
पिंपरी चिंचवड:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल रॉय यांनी आम आदमी पार्टीमध्ये पुणे येथे गुरुवार दि 10 रोजी प्रवेश केला. नुकत्याच दोन महिन्यापुर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मूख्य आरोग्य आधीकारी डॉक्टर रॉय सेवानिवृत्त झाले होते.त्यानंतर त्यानी आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम पाहुन ,प्रेरित झाले व आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला.
डॉ रॉय यांचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात संपर्क आहे. येण्यार्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे पक्षाला कितपत फायदा होतो ,हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रवेशावेळी राज्य संघटक वीजय कुंभार, आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरशट ,प्रवक्ते प्रकाश हगवणे,डॉ अमर डोंगरे,सिताताई केंद्रे,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









