पोलिसांची नेत्र दीपक कामगीरी साडेतेरा लाखाचा गुटखा जप्त.

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.comपिंपरीचिंचवड-प्रतिनिधी नामदेव मेहेर. येरवडा

पोलिसांनी (Yerawada) रामवाडी येथून सुमारे पावणे चौदा लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.28) केली.
सवाराम लाबुराम देवासी (वय 9 रा. कोंढवा मुळराहणार राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमंलदार सोमनाथ भोराडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गुटखा घेऊन एक टेम्पो शास्त्रीनगर चौकाकडून पुणे-नगर मार्गाने जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सिद्धार्थनगर येथील रामवाडी पोलीस चौकीजवळ सापळा रचला व टेम्पो चौकासमोर येताच टेम्पो चालक व टेम्पोला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने हा टेम्पो कोंढवा व वाघोली (Yerawada) येथून नेत असल्याचे कबुल केले. टेम्पोमधून पोलिसांनी 13 लाख 87 हजार 880 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहेत.
ही कारवाई येरवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर, पोलीस हवालदार एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार सोमनाथ भोरडे, आनंदा भोसले यांनी केली.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!