www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२२ खरीप व रब्बी हंगामातील नुकसान पिकांना सरसकट अनुदान करीता डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी ३७ कोटी रक्कम ची मागणी केली असता मंत्री महोदय सावंत साहेब व कृषी व पशुसंवर्धन मा सभापती दत्ता आण्णा साळुंके म्हटले गणेशराव परंडा तालुक्यात ४५ कोटी रक्कम शेतकऱ्यांना लवकरच खात्यावर वर्ग करणार आहोत असे संबोधले.
भुम परंडा वाशी मतदार संघाचे आमदार मंत्री महोदय धाराशिव चे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी परंडा तालुक्यातील सततच्या पावसामुळे/अतिवृष्टीमुळे धोक्यात आलेल्या २०२२ मधील खरीप हंगाम व रब्बी हंगामातील पिकांची आज रोजी पाहाणी केली २९ ऑक्टोबर पर्यंत सरसकट पंचनामे करून तहसील कार्यालय तहसीलदार साहेब यांना आदेश देऊन कलेक्टर ऑफिस ला वाढीव निधी चा अहवाल सादर करावा असे आदेश दिले. आज परंडा तालुक्यातील खानापूर व कुभेंजा येथे शेतकरी कोकाटे यांच्या शेतातील सोयाबीन, मिरची, टोमॅटो, तुर, कांदा इ पिकांची पहाणी केली असता पिकांची अवस्था किडरोग, फुलगळ, पोचट दाणे, पिकांची उंची खुटंली आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप नुकसान झाले हे कळल्यावर तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट अनुदान मिळाले पाहिजे असे आदेश प्रशासकीय यंत्रणा ला दिले यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.