भैरवनाथ साखर कारखान्याच्या विरोधात धडक मोर्चा.

Picture of starmazanews

starmazanews


www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

भैरवनाथ साखर कारखान्याने शेतकऱ्याला सरकारी किफायतशीर दर न देता गोड बोलून तोंडाला पाने फासलेले आहेत शेतकऱ्यांची फार मोठी पिळवणूक करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फार मोठी लूट केलेली आहे तरी भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या हितार्थ गळीत हंगाम 2021- 22 ऊसाला इतर कारखान्याबरोबर भाव देण्यासंबंधी दिनांक 27-10-2022 रोजी वार गुरुवार वेळ सकाळी 11 वाजता भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी या कारखान्याच्या विरोधात भूम परंडा वाशीचे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील व शिवसेना धाराशिव जिल्हाप्रमुख गौतम लटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य मोर्चा निघाला तालुक्यातील सर्व राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते .
मोर्चा मार्ग – खासापुरी चौक- मंडई पेठ – गोल्डन चौक – छ. शिवाजी महाराज चौक – तहसील कार्यालय परंडा. परंडा – येथील तहसिलदार यांना निवेदन देवून व मान्यवरांच्या भाषणाने मोर्चाचे सांगता करण्यात आले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

मोर्चा व्हिडिओ
starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!