व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत 18 ऑक्टोबर रोजी खासदार श्रीरंग बारणे यांची महत्वपुर्ण बैठक.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.comपिंपरी चिंचवड प्रतिनिधी नामदेव मेहेर


मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने पिंपरी कॅम्प आतील व्यिपार्याच्या अडचणी ,समस्याबाबत उद्या मंगळवार १८ महत्वपुर्ण बैठक आयोजित केली आहे. यि बैठकिला महापालीका आयुक्त शेखर सिंह ,पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, वाहतूक पोलीस हजर असणार आहेत. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांना येणार्या समस्यांवर तोडगा काढण्यात येणार आहे. पिंपरी कॅम्पातील बी टी हॉलमध्ये मंगळवार दि१८ सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी कॅम्प ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे शहराच्या उपनगरातील नागरिक खरेदीसाठी येतात . दिवाळाचा सन तोंडावर आहे. त्यामुळे खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे ग्राहकांना वाहणे लावण्यासाठी जागा आपुरी पडते फुटपाथवर काही विक्रेते बसत असल्याने वाहने लावण्यासाठी जागा मिळत नाही त्यामुळे वाहतूक कोंडी होते ल्पास्टिकच्या पिशव्या वापराच्या की नाही यावरुन व्यापार्यामधे संभ्रम आहे. महापालीका अधिकारी कारवाई करतात त्यावरुन वादाचे प्रकार घडतात अशा अनेक समस्या मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला आहे.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!