वीज मीटर बसवून देण्याची हमी देत रिक्षाचालकाची फसवणूक.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com प्रतिनिधी सोमनाथ गायकवाड

वीज मीटर बसवून देण्याची हमी देत रिक्षाचालकाची फसवणूक त्या प्रकरणी फसवणुकीसह इतर कलमाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, लष्कर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सी. एन. ओंढरे यांनी हा आदेश दिला आहे..
रज्जाक इसाक सय्यद यांनी ऍड.अफरोज शेख यांच्यामार्फत खाजगी तक्रार दाखल केली होती
यावर सुनावणी करत नितीन रमेश नाईक याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहे. सय्यद यांना त्यांच्या इमारतीमध्ये मीटर बसवायचा होता, इलेक्ट्रिशियन च्या मार्फत फिर्यादी व नाईक यांची ओळख झाली.
मी महावितरण ठेका घेतो असे म्हणत, त्याने या अधिकारात 15 दिवसात मीटर बसवून देतो असे आमिष नाईक यांनी फिर्यादिस दिले, त्यानुसार फिर्यादीने 1
मार्च 2022 रोजी 46 हजार रुपये त्यांना दिले, मात्र मीटर बसवण्यात आला नाही व पैसेही परत देण्यात आले नाहीत, असे फिर्यादीने सांगितले,
अधिक तपास केला असता महावितरण व नाईक याचा कसलाही संबंध नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले, त्यामुळे न्यायालयात ऍड. अफरोज शेख यांच्यामार्फत, तक्रार दाखल केली होती..

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!