www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
*सततच्या पावसाने बाधित पण 65 मि. मी. च्या निकषात न बसणाऱ्या राज्यातील आणखी 6 लाख शेतकऱ्यांना 755 कोटींची मदत राज्य सरकारच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे. निकषात बसणाऱ्या 30 लाख शेतकऱ्यांना 3600 कोटी यापूर्वीच वितरित करण्यात आले आहेत.जिल्ह्यातील चार तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना 107 कोटी 2 लाख 10 हजार निधी मिळणार आहे. त्यात सर्वाधिक 63 कोटी रुपये बार्शी तालुक्यासाठी असणार आहे अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.*
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपदग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मंत्री गिरीश महाजन साहेब उपस्थित होते. त्याबाबत मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
आता आणखी 6 लाख शेतकऱ्यांना 755 कोटी मदत मिळणार आहे. ही मदत निकषात बसत नव्हती. मात्र विशेष बाब म्हणून आज मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. यामुळे आणखी 5,49,646 हेक्टर क्षेत्राला लाभ मिळणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, दक्षिण सोलापूर, अप्पर मंद्रुप आणि अक्कलकोट तालुक्यातील 1 लाख 13 हजार 864 शेतकऱ्यांच्या 74 हजार 446 हेक्टर वरील बाधित पिकांसाठी 107 कोटी 21 लाख 780 रुपये मिळणार आहेत. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 23 सप्टेंबर रोजी कृषी आयुक्तालयाकडे पाठवला होता.
तालुकानिहाय मिळणारी मदत
बार्शी- बाधित शेतकरी-66029,बाधित क्षेत्र-44122 अपेक्षित रक्कम-63 कोटी 72 लाख 3200,
दक्षिण सोलापूर-10573-7960-12 कोटी 2 लाख 3680,
अप्पर मंद्रुप-879-1042-1 कोटी 57 लाख59500
अक्कलकोट- 33383-21321-29 कोटी 70 लाख 24400
बार्शीसह जिल्ह्यातील या वगळलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन विभागाचे मुख्य सचिव गुप्ता यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती.जिल्हाधिकारी यांची ही भेट घेऊन सध्यस्थितीची माहिती दिली होती.
हा निधी मिळावा यासाठी मी मागील महिनाभरापासून पाठपुरावा करत आहे.विशेष बाब म्हणून हा राज्य सरकारने हा निधी देऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे —
आमदार राजाभाऊ राऊत .

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.