www.starmazanews.com परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा : महाराष्ट्र राज्याचे आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ तानाजीराव सावंत शुक्रवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी 11:00 वाजता
जनता दरबारात लोकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. महसूल, ग्रामविकास, महावितरण, आरोग्य, सहकार, शिक्षणासह अनेक विभागाशी संबंधित तक्रारींवर डॉ सावंत सुनावणी घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विभागाचे सर्व उच्च अधिकारी जनता दरबारात उपस्थित राहणार आहेत. उल्लेखनीय आहे की, गेल्या आठवड्यात तहसील कार्यालयात झालेल्या जनता दरबारात आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी लोकांच्या समस्या ऐकल्या होत्या. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अगोदर मी जनता दरबार घेणार असून या जनता दरबारात पूर्वीचे प्रश्न मार्गी लावले का हे विचारणार असल्याचे अधिकाऱ्यांना त्यांनी त्यावेळी बजावून सांगितलं होते. याच पार्श्वभूमीवर शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृहात दिनांक १६ सप्टेंबर शुक्रवार रोजी शहरातील लोकनेते कै गोपीनाथ मुंडे सभागृहात महाराष्ट्राचे अरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांचा जनता दरबाराचे अयोजन करण्यात आले असून सभागृह परिसराची पहाणी करताना जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत तहासिलदार रेणुकादास दिवणीकर माजी नगरसेवक रतनकांत शिंदे परंडा सज्याचे तलाठी तथा परंडा तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कसाब सुर्यवंशी आदि मान्यवर उपस्थित होते
www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.