www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
आर्यन शुगर या साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलांची ( एफ.आर.पी. ) २१ कोटी रुपये रक्कम जमा करणे संदर्भात आठ दिवसांत निर्णय घेण्याचे मा.जिल्हाधिकारी मिलींदजी शंभरकर साहेब यांनी आदेश दिले आहेत — आमदार राजेंद्र राऊत.

गुरुवार दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी, मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी आर्यन शुगर या साखर कारखान्याकडे थकीत असलेल्या शेतकऱ्यांची एफ.आर.पी. रक्कम २१ कोटी वसुली बाबत बैठक आयेाजित केली हेाती. सदर बैठकीस आमदार राजाभाऊ राऊत, साखर संचालक, जिल्हा उपनिबंधक, सरव्यवस्थापक- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, तहसिलदार बार्शी व ॲड. सागर रोडे उपस्थित होते.

सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे सुमारे एक ते दीड तास चालली. त्यामध्ये सविस्तर चर्चा होऊन कारखाना खरेदीदार यांनी कारखाना खरेदी केल्यानंतर संपूर्ण ६८ कोटी रुपये बँकेकडे भरलेले आहेत. मा. साखर संचालक यांचे आदेशाने मा. जिल्हाधिकारी यांना एफ.आर.पी. ची रक्कम वसूल करण्याचा अधिकार आहे. या अधिकाराने मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी बँकेचे अधिकारी यांना रक्कम किती दिवसांत शासनाकडे जमा करणार याची विचारणा केली. तसेच कारखाना हस्तांतर झाला तरी शासनाचा बोजा हा जमीनीवर व मशिनरीवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची थकीत एफ.आर.पी. २१ कोटींची रक्कम ही द्यावीच लागेल असे मा. जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी यांना सदरची रक्कम भरणे बाबत काय निर्णय होणार व केव्हा जमा करणार याबाबत आठ दिवसांत निर्णय घ्या असा आदेश मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी दिला.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.