www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहरातील काही भागात अनेक महिन्यापासून शासनाने गुंठेवारी खरेदी विक्रीस निर्बंध लादल्याने अनेक मिळकत धारक अडचणीत सापडले असून या मिळकतदाराला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने गुंठेवारी खरेदी-विक्री करण्यास परवानगी देण्याची मागणी ग्राहक कल्याण फाऊंडेशन पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सोलापूर परिसरातील हद्द वाढ भागातील जुळे सोलापूर देगाव शेळगी केगाव सोरे गाव गावठाण बाळे रचना सोसायटी प्रसाद नगर मिरानगर रोहिणी नगर स्वामी विवेकानंद नगर सुभाष नगर नीलम नगर स्वागत नगर यासह अनेक नगरास गुंठेवारी खरेदी विक्री परवानगी नसल्याने आर्थिक फटका बसत आहे लाखो गोरगरिबाचे वास्तव्य असून या लोकांनी गुंठेवारी मध्ये बांधकाम परवाना घेऊन घरे बांधले असून आता घरे बांधण्यास परवानगी मिळत नाही बांधलेल्या घरांची खरेदी अथवा विक्री होत नाही जवळपास 90% टक्के मिळकती आहेत मागील काही महिन्यापासून राज्य सरकारने गुंठेवारी असलेल्या परवानगी नाकारली आहे गुंठेवारी भागातील लोकांनी वेगवेगळ्या बँकेकडून कर्ज काढून या भागात घरी बांधले आहेत या भागातील खरेदी विक्रीला मनाई केल्याने लाखो रुपयाचे नुकसान होत असून त्याचबरोबर राज्य सरकारचा देखील लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे गुंठेवारी खरेदी विक्री बंद असल्याने या भागातील घरे भावाने विक्री केली जात आहेत गुंठेवारी दस्त बंद असल्याने हजारो मिळकती खरेदी विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत गुंठेवारी खरेदी विक्रीला परवानगी नसल्याने अनेकांना सावकारांच्या दारी उंबरटे झिजवून ज्यादा व्याज दराने कर्जे काढावी लागत आहेत तरी माननीय विभागीय आयुक्त पुणे यांनी या गुंठेवारी प्रश्न जातीने लक्ष घालून सोलापुरातील गुंठेवारी खरेदी विक्री परवानगी देण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी ग्राहक कल्याण फाउंडेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त पुणे विभाग त्यांच्याकडे केली आहे यावेळी राष्ट्रीय भूमी महास्वराज्य पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर पराग येदूर सादिक शेख प्रसाद जगताप इत्यादी उपस्थित होते

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.