समर्थ तरुण गणेश मंडळ यांच्या वतीने दिनांक 2 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिर.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज- परांडा प्रतिनिधी :-गोरख देशमाने


परंडा शहरातील सोमवार पेठ बागेतील समर्थ तरुण गणेश मंडळ यांच्या वतीने दिनांक 2 सप्टेंबर शुक्रवार रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले एकावन गणेश भक्तांनी रक्तदान केले . या शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर पाटील यांनी केले . यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष मुकुल मालक देशमुख ,मकरंद जोशी , अब्बास मुजावर , पो. पाटील संजय कदम पाटील हे उपस्थित होते . बार्शी येथील रक्तपेढी यांनी सहकार्य केले .शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते प्रसाद वैद्य ,औदुंबर यादव , नागेश वैद्य , बाळासाहेब वडतीले ,बाळू शेळके , सोन्या काळे , राजेश कुंभार ,संतोष कदम ,गणेश क्षीरसागर , परांडकर , आनंद देवळे ,अनुप विद्वत यांनी परिश्रम घेतले . जीवनात रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानले जाते . मंडळाच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले .

स्टार माझा न्यूज :-रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!