www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898
बार्शी दि.( प्रतिनिधी ) श्री भगवंत भक्त राजा अंबरीष सार्वजनीक अन्नछत्र मंडळ यांचे नुतुन जागेत स्व.सौ.शोभाताई सोपल स्मृती सभागृह या ठिकाणी ह-भ-प जयवंत महाराज बोधले यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून माजी मंत्री दिलीप सोपल,बार्शी नगरपालिका विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, माजी नगराध्यक्ष गणेश जाधव, भगवंत देवस्थान मंदिर सरपंच दादा बुडुक, उपसरपंच नाना सुरवशे,प्रसन्नदाता मंडळाचे अध्यक्ष कमलेश मेहता,श्री भगवंत भ.रा.अंबरीष मंडळाचे अध्यक्ष अरुण(बंडू) माने, उपाध्यक्ष आबा भोसले,सचिव आबासाहेब कानगुडे, खजिनदार देबडवार दादा व सर्व ट्रस्टी व सर्व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे अध्यक्ष अरुण माने प्रस्ताविकेत म्हणाले सुरुवाती पासुन ज्यांनी मदत केली व आज पर्यंत जे आम्हाला मदत करत आहेत त्यांचे सर्वांचे आभार मानतो व भविष्यातही बार्शीकर मदत करतील.या प्रसंगी माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले की सगळ्या दानात श्रेष्ट असे अन्नदान जे हे मंडळ करत आहे.त्यासाठी बार्शीकर सदैव आपल्या पाठीशी आसतील.माझ्या कडून काही मदत पाहिजे असेल तर मी जरुर ती करेल.या नंतर ह.भ.प.बोधले महाराज यांनी श्रावण महिन्या चे महत्व सांगताना व भगवंत मंदिरात चालू असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पारायण चालू आहे.श्रावण महिना ही आहे व योगही चांगला आहे .गुरुपुषार्मुत आहे असे म्हणाले.या वेळी बा.न.पा.विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोठे व मंडळाचे सचिव आबा कानगुडे यांनी ही त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष अभिमान भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सर्व सभासदांनी व मित्र मंडळांनी परिश्रम घेतले.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.