गडकोट-भुईकोट”किल्ल्यांच्या संवर्धनासह विविध मागण्याचे तहसीलदारांना निवेदन.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

परंडा,ता.३(प्रतिनिधी )राज्यातील ऐतिहासिक ठेवा ” गडकोट-भुईकोट”किल्ल्यांच्या संवर्धनासह विविध मागण्याचे निवेदन तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांना देताना शिवप्रेमी,छञपती शासन ग्रुपचे पदाधिकारी !
राज्यातील वैभवशाली ऐतिहासिक गडकोट-भुईकोट किल्ले जतन दुरुस्ती, गड संवर्धनासह इतर आकरा मागण्यांचे निवेदन तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांना बुधवार ता.३ रोजी छत्रपती शासन ग्रुप,शिवप्रेमींच्यावतीने देण्यात आले.यावेळी छञपती शिवरायांचा नामघोष करण्यात आला. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सध्या राज्यातील मौल्यवान ऐतिहासिक ठेवा असलेल्या पन्हाळागड,विशाळगड आदि गडकोट भुईकोट किल्ल्यांची मोठी पडझड झाली आहे.जतन दुरुस्तीसह गडसंवर्धनासाठी पुरातत्व विभाग,शासनस्तरावरुन देखभाल होणे गरजेचे आहे.परंडा तहसील कार्यालय येथे जाऊन गड संवर्धनासंदर्भातच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मध्ये गड किल्ल्याच्या संदर्भात स्वतंत्र मंत्रालय उभारण्यात यावे.
पुरातन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गडांची डागडुजी करण्यात यावी. गडांना ऐतिहासिक स्थळाचा दर्जा मिळावा. गडकोट किल्ल्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावल उचलली जावी.गडकोट संवर्धन केले जावे. व गडकोट किल्ल्यांची जपणूक केली जावी.गडकोट किल्ल्यांचा होत असलेला ऱ्हास थांबवावा. गडकोट किल्ल्यांच्या ठिकाणी मद्यपान व पशु हत्या रोखली जावी. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची चुकीची कृत्य होऊ नये अशी सुरक्षितता असावी.
गड संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध करून लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये गड संवर्धन ऐतिहासिक वारसा जपला जावा.स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या मावळ्यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व देखभाल केली जावी.गड किल्ले संवर्धनासाठी शासनाने स्वतंत्र बँक खाते काढावे. गडकिल्ल्यांचा पर्यटनासाठी नाही तर ऐतिहासिक स्थळांसाठी आणि अस्मितेसाठी विकास केला जावा. गड संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व खात्याने ठोस पावलं उचलावी. विनाकारण त्यांच्या नियमावलीच्या अडचणीमुळे गड संवर्धनाला विरोध करू नये. अशा प्रकारच्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.यावेळी छञपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी,समाधान कोळेकर,बालाजी भागडे,राजेश कारंडे,विकी माळी,आप्पा पांढरे,शिवाजी देवकर,जयराम धनवे,सुनिल घोगरे,रत्नमाला निकाळजे,कानिफनाथ सरपणे,अतुल झिरपे,कमलेश भागडे,गणेश वरपे,गणेश चोपडे,आप्पा भागडे आदिसह शिवप्रेमींची उपस्थिती होती.

www.starmazanews.com संपादक रियाज पठाण 9405749898/9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!