starmazanews.com ठाणे जिल्हा प्रतिनिधी चंदन ठाकूर
होणारे नवीन मुख्यमंत्री तथा माजी नगरविकास एकनाथ शिंदे च्या नावाने मीरा भाईंदर मध्ये अनधिकृत बांधकामाला संरक्षण, दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली टोलेजंग अनधिकृत बांधकामे उभी.
मीरा भाईंदर शहरात अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्यासाठी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा मा.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव व वस्तू व सेवा कर विभागातील उपायुक्त असलेले सध्या मीरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त पदी बेकायदेशीर रित्या नियुक्ती झालेले पालिका आयुक्त दिलीप ढोले व त्यांच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड यांनी एक नवीन युक्ती लढवत शहरात दुरुस्ती परवानगीच्या नावाखाली टोलेजंग अश्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण देऊ त्यात मा.मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वापरून संरक्षण देत आपला भ्रष्टाचाराचा गाडा चालवीत आहे. तर मीरा भाईंदर महापालिकेतील टेंडर ते नगररचना विभागा पर्यंत अनधिकृत गोष्टींसाठी नाव वापरून आपली झोळी भरण्याचे काम चालू केले आहे. याबाबतीत राज्य शासनाकडे अनेकांनी तक्रारी करूनही त्यावर कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शहराचे नाव बदनाम होत आहे म्हणून डान्सबार, लॉजिंग यांच्यावर कारवाईचे ढोंग सुद्धा केले व काहींना चेंज ऑफ व्युव्ह करून दिले.
स्टार माझा न्यूज :- संपादक– रियाज पठाण 9405749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










