स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
ओबीसी आरक्षणात घातलेला राजकीय घोळ, येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसी एकजुटीने दूर कारण्याचा निर्णय काल विश्रामग्रह परंडा उस्मानाबाद येथे झालेला घेण्यात आला.
आरक्षण हक्क संवर्धन समितीच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज व पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या ओबीसी जागर अभियानाचे भव्य स्वागत करण्यात आले.
कळंब तेथे झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी रिपाई नेते संजय बनसोडे हे होते.ओबीसी जागर प्रमुख लता बंडगर,आरक्षण हक्क संवर्धन समितीचे संघटक श्याम निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आज झालेल्या सभेत दिलीप निकाळजे,डॉ.प्रा.सुभाष मारकड,दयानंद बनसोडे, अप्पा तरते,उमाकांत गोरे,धनंजय सोनटक्के, श्यामराज शिंदे,किरण बनसोडे,पांडुरंग मुसळे, कानिफनाथ तांबिले,राहुल पवार,राजेश शिंदे,राहूल पवार,शहाजी सोलंकर यांनी मार्गदर्शन केले.
या सभेस प्रदीप परिहार, अनधिर मिसाळ,योगेश मारकड,हमराज काळे,प्रदीप पाटील,प्रतीक सलगर, शिवाजी चौरमोले,गणेश जाधव,शंकर पाटील, सचिन कुठे यांची उपस्थिती होती.
आरक्षण हक्क संवर्धन समिती उस्मानाबादच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी जागर अभियानाचा समारोप २५ जून रोजी व्ही.पी.सिंग यांच्या जयंती दिनी उस्मानाबाद येथे होणार असल्याचे श्यामराज शिंदे ,प्रकाश काशिद प्रमोद वेदपाठक व कानिफनाथ तांबिले यांनी सांगितले
स्टार माझा न्यूज –संपादक:- रियाज पठाण9405749898/9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.










