भाजपा आपल्या गावी अभियानाची सुरुवात.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

भाजपा आपल्या गावी अभियानाची सुरुवात भाजपाचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार श्री. सुजितसिंहजी ठाकूर साहेब व धाराशिव भाजपाचे नेते आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा आपल्या गावी या अभियानाची सुरुवात संपूर्ण जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे.


केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा या अभियानाचा उद्देश आहे.
जिल्हा परिषद गटांमध्ये अभियान प्रमुख श्री हनुमंतजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक रोजी मुगाव चे ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनाने करण्यात आली याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना केंद्र सरकारच्या विविध जन कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.


या अभियानास मुगाव-शिरगिरवाडी ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला व विविध योजनांची माहिती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले..
याप्रसंगी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कांतीलाल पाटील कौडगाव सरपंच तुकाराम हजारे भोंजा सरपंच शरद कोळी भाजपा नेते विलास खोसरे श्रीमंत शेळके पै.नवनाथ नेटके राहुल जगताप नानासाहेब साबळे दयानंद बंडगर व ग्रामस्थ उपस्थित होते..!

स्टार माझा न्यूज संपादक:-रियाज पठाण 9405749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!