स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधि गोरख देशमाने
परंडा-शहरात भुसे फिल्म स्टुडिओ येथे आयोजीत बाल महोत्सवाचे उदघाटन करताना प्रसिद्ध चिञपट संगीत दिग्दर्शक प्रा.डाॕ.जयभीम शिंदे,यावेळी शंकर भुसे,डाॕ.मंदार पंडीत,प्रकाश काशीद,रणवीर निकाळजे,आदि!
२)संगीत दिग्दर्शक डाॕ. जयभीम शिंदे नवोदित कलाकार मुलामुलींना मार्गदर्शन करताना!
३)महोत्सवात नृत्यअविष्कार सादरीकरण करताना शुभम भातलवंडे!!(छायाचिञ-भुसे आर्ट स्टुडिओ परंडा) परंडा,ता.३०(प्रतिनिधी )ग्रामीण भागातील कलाकारांसाठी कथा,व्यथा यांना खुप मोठे दालन खुणावत आहे.येणाऱ्या कालावधीत ग्रामीण संस्कृती कलावारसा याचा चिञपट,नाटक,संगीत या सर्व क्षेञात दबदबा निर्माण होणार आहे.यासाठी नवोदित कलाकारांनी संधीचा फायदा घेण्यासाठी तत्परता दाखवावी असे मत प्रसिध्द चिञपट संगीत दिग्दर्शक प्रा.डाॕ.जयभीम शिंदे यांनी व्यक्त केले.

शालेय बाल,युवा कलाकारांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळण्यासाठी परंडा शहारात रविंद्रनाथ टागोर कलानिकेतन,भुसे फिल्म स्टुडिओ,सदगुरु काॕम्प्युटर आयोजीत दोन दिवसीय बाल कला महोत्सवाचे शहरात सोमवार ता.३०,३१ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे.या बाल महोत्सवाचे उदघाटन प्रसिध्द चिञपट संगीत दिग्दर्शक प्रा.डाॕ.जयभीम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सिने अभिनेता रणवीर निकाळजे,पञकार प्रकाश काशीद,डाॕ.मंदार पडींत,आलम खान,स्नानंद कुलकर्णी,नृत्य दिग्दर्शक शुभम भातलवंडे,संगीत विशारद प्रकाश शिंदे,शंकर भुसे आदिंची उपस्थिती होती.हरहुन्नरी लहानमुले,शालेय विद्यार्थी,युवा मुलामुलींच्या कलागुणांना वाव मिळुन कलाअविष्कारसाठी व्यासपीठ मिळावे या संकल्पनेनुसार बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांचा न्युनगंड जावुन कुठल्याही माध्यमामध्ये निर्भिड,आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी या महोत्सवामुळे नक्कीच लाभ होईल असे आयोजक शंकर भुसे यांनी सांगितले.

या बाल महोत्सवात नृत्य,बालचिञपट दाखविणे,चिञकला स्पर्धा,एकपाञी प्रयोग,आदिंचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी उपस्थित बाल नवोदित कलाकार मुलामुलींनी विचारलेल्या प्रश्नांला संगीत दिग्दर्शक जयभीम शिंदे,रणवीर निकाळजे यांनी दिलखुलासपणे उत्तरे देवुन कलेविषयी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात नृत्य दिग्दर्शक शुभम भातलवंडे यांनी गोंधळी गीत,ऐतिहासिक गीतावर नृत्यअविष्कार सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.बालकलाकरांनीही विविध गीतावर नृत्य अविष्कार सादर केला.कार्यक्रमाचे सुञसंचालन शंकर भुसे यांनी केले तर आभार सचिन भुसे यांनी मानले.मंगळवार ता.३१ रोजी या महोत्सवात बार्शी येथील मंदार कुलकर्णी यांचा विनोदी एकपाञी प्रयोग सादरीकरण होणार आहे.नवोदित कलाकार मुलामुलींनी याचा लाभ घेण्याचे अवाहन आयोजक शंकर भुसे यांनी केले आहे.या बाल महोत्सवात लहान मुले,शालेय मुलामुलींनी सहभाग नोंदविला आहे.
स्टार माझा न्यूज संपादक रियाज पठाण 9405749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.