महात्मा फुले महामंडळाचे मंजूर झालेले कर्ज वितरीत करा – लोजपाची मागणी.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

महात्मा फुले महामंडळाचे मंजूर झालेले कर्ज वितरीत करा – लोजपाची मागणी
कळंब – २०१९ साली मंजूर झालेले महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ व एनएसडीपी मार्फत मंजूर झालेले कर्जप्रकरणे त्वरित वाटप करा ह्या मागणीचे निवेदन दिनांक २० मे २०२२ रोजी लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी यांना देवून मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
जातीच्या प्रमाणपत्रासाठी ज्यांचे पुरावे उपलब्ध नाहीत त्यांची स्थानिक चौकशी करून तात्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे, विद्यार्थी साठी लागणारे कागदपत्रे तर एका दिवसात देण्यात यावे,श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना पगारी तीन हजार रुपये पर्यंत करावी,२१००० रु.चे उत्पन्न प्रमाणपत्र ८ दिवसांत द्यावे,कोरोनाची मदत बऱ्याच लोकांना मिळालेली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी,भूमिहीन शेतमजुराला स्वाभिमान सन्मान सबलीकरण योजनेतून जमीन कसणाऱ्याला जमीन मिळावी,पी.एम.किसान (शेतकरी) योजनेची पगार ३००० रु करून पीककर्जात डबल वाढ करावी.शेतकर्‍यांना खते व बी-बियाणे मोफत वाटप करावी,विद्यार्थ्यांस वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यात यावा.गॅसची किंमत तीनशे रुपये करा,मजुराला डबल मजुरी द्या, शेतकऱ्यांचा राहिलेला ऊस वेळेत नेऊन त्याचे बिल ८ दिवसांच्या आत द्यावी आदी मागण्या ३० मे पर्यंत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
ह्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,भारत कदम,बजरंग धावारे,बाबा टोपे, रेखा सावंत,नीलम आंधारे,गौतम हजारे,एम.डी.चिलवंत,अरुण कांबळे आदींच्या सह्या आहेत.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!