www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी – राष्ट्रवादी युवक काँग्रेस बार्शी च्या वतीने आज बार्शी तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. गॅस दर वाढ, इंधन दर वाढ, सततची महागाई, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण न देणे तसेच देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल फेसबुक वर अतिशय खालच्या पातळीला जाऊन पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेच्या विरोधात जोरजोरात घोषणा देऊन निषेध करण्यात आला, यावेळी नायब तहसीलदार काझी साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात गॅस दर वाढ, इंधन दर वाढ, सततची महागाई कमी करावी व या सर्व मागण्या प्रशासन दरबारी मांडण्यात याव्या असे नमूद केले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी चे नेते विक्रम सावळे सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा बार्शी चे युवक निरीक्षक अभिषेक आव्हाड, राष्ट्रवादी ग्रंथालयचे प्रदेश सरचिटणीस शिवशंकर ढवण, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अमोल बदे, युवा नेते शिरीष ताटे, बार्शी युवक तालूकाध्यक्ष अमर पाटील, उपाध्यक्ष अमोल एडके, रियाज पठाण, उत्कर्ष डुरे, शरद गायकवाड, नवाज मुलानी, किशोर देशमुख, अतिश गायकवाड, दादा कुरळे, नंदकुमार गिरमकर, आकाश जाधव उपस्थित होते.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.