www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी तालुक्यातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून, आमदार राजाभाऊ राऊत दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब यांच्या भेटीला.
दिल्ली येथे आमदार राजाभाऊ राऊत यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा.ना. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन, त्यांना बार्शी तालुक्यातील बार्शी तुळजापूर रस्ता राज्य मार्ग क्र. २०६ ची राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करणे बाबत, तसेच बार्शी तालुक्यातून जाणारा माढा-वैराग-उस्मानाबाद रस्ता राज्य मार्ग क्र.२०३ ची राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करणे बाबत व बार्शी तालुक्यातील रस्ते मजबुतीकरण व नूतनीकरणासाठी सी.आर.एफ.अंतर्गत निधी उपलब्ध व्हावा या मागणी संदर्भातील पत्र दिले.
याबाबत मा. नितीनजी गडकरी साहेब यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद देत, पत्रातील मागण्यांचा प्रामुख्याने विचार करून लवकरच निधी उपलब्ध केला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी माढ्याचे खासदार मा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









