www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
*भाजपा स्थापना दिनानिमित्त आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालयात भाजपा स्थापनादिन साजरा..*????
*भारताच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या भारतीय जनता पार्टी (BJP) आज स्थापना दिवस. अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांच्या प्रोत्साहनाने अन् परिश्रमाने पक्षाचा पाया रोवला गेला आणि त्यानंतर नवोदित कार्यशील नेतेमंडळीच्या सहकार्याने पक्षाची उभारणी भक्कम झाली. सध्या पक्षाची वाटचाल देशाच्या व जनतेच्या विकासासाठी सुरु आहे. पक्षातर्फे जनतेची कामे अविरतपणे चालू आहेत म्हणूनच भाजपा हा जनतेच्या हक्काचा पक्ष बनला आहे.*

*भाजपा स्थापना दिनानिमित्त आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या संपर्क कार्यालय येथे परंडा तालुकाध्यक्ष श्री. राजकुमार पाटील यांच्या हस्ते भाजपा ध्वज फडकवला आणि भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..*

*यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, जिल्हा चिटणीस ॲड. गणेश खरसडे, ता. सरचिटणीस विठ्ठल तिपाले, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड. संदीप शेळके, ॲड. विनोद गोडगे उपस्थित होते..*
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898