www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने
दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी भूम शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अपंग संघटना जिल्हा अध्यक्ष श्री प्रदिप डोके यांच्या वाढदिवसानिमित्त *भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब* यांनी शाल फेटा श्रीफळ देऊन अभिष्टचिंतन केले.

त्यावेळी भूम राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते सुळ सर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उस्मानाबाद चे विद्यमान संचालक संजय पाटील आरसोलीकर, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण खटाळ, परंडा अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल घोडके, तेरखेडा येथील माने, यांच्यासह अपंग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

*भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल भैया मोटे साहेब* यांनी अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व आपण अपंग असताना देखील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वाढीसाठी खूप अनमोल असं सहकार्य केले त्याबद्दल अभिनंदनही केले.
www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.









