www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
दि :- 25 मार्च 2022
बार्शी नगरपरिषदेने सध्या कर वसुली च्या निमित्ताने अन्यायकारक पद्धतीने पठाणी वसुलीचा लावलेला सपाटा हा बार्शी करांवर अन्यायकारक असून बेकायदेशीर बजेट बाह्य कामांची बिले देण्यासाठी फक्त आणि फक्त बार्शी कराना वेठीस धरण्याचा प्रयत्न असल्याचे माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी म्हटले आहे
बार्शी नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने सध्या कर वसुलीची मोहीम सुरू असून या मोहिमेअंतर्गत अन्यायकारक पद्धतीने करांच्या वसुलीसाठी नागरिकांच्या मालमत्तांना कुलुपे लावणे ,नळ कनेक्शन तोडणे , वर्तानपत्राद्वारे नावे प्रसिध्द करणे , मालमत्ता विक्री करणे, मालमत्ता वर बोजे चढवणे बाबत धमकावणे असे प्रकार सुरू आहेत .वास्तविक पाहता कोरोना महामारी चे संकट , महागाई या संपूर्ण पार्श्वभूमीवर सामान्य नागरिक होरफळलेला असताना नगरपरिषदेने न पुरवलेल्या सुविधांचा कर वसुलीसाठी जी पद्धती अवलंबली आहे ती अत्यंत चुकीची आणि नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सामान्य माणसाची इज्जत वेशीवर टांगण्याचा प्रकार सुरू असल्याचा घणाघात अक्कलकोट यांनी केला आहे
अक्कलकोटे पुढे बोलताना म्हणाले की मावळते सत्ताधारी नगरपरिषदेवर घरपट्टी पाणीपट्टी चे व्याज माफ करू म्हणून सत्तेवर आले होते .मात्र या दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार ने थैमान घातलेलं होतं. नागरिकांना पाच वर्ष पाणी ,रस्ते ,गटार या सुविधांपासून वंचित ठेवून विकास कामाच्या नावाखाली सुड उगवण्याचा प्रयत्न झाला. या संपूर्ण पार्श्वभूमीवर नागरिकातून नगरपरिषदेला देय असणारे कर भरणे बाबतीत नागरिकांची नाराजी आहे. तसेच बेकायदेशीररित्या बजेट तरतूद नसताना प्रस्तावित करण्यात आलेली कोट्यावधी रुपयांची कामे फक्त आणि फक्त ठेकेदाराच्या प्रेमापोटी प्रशासनाकडून डोळेझाक करून बिले आदाई करण्यात येत आहे.
आजही नगरपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर देखील कोणाच्या सांगण्यावरून नगरपरिषदेच्या अकाउंट विभागाचा कारभार चालतो हे बार्शी करांना माहित आहे. नगरपरिषदेने नुकतेच थकीत करदात्यांची नावे वर्तानपत्राद्वारे प्रसिद्ध केली यावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. यामध्ये देखील लाखो कोट्यवधी रुपयांची थकबाकी असणाऱ्या अनेकांची नावे यामध्ये वगळण्यात आली. मात्र सामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या नावाची प्रसिद्धी करून त्यांची बेअब्रू करण्यामागे नगरपालिकेने काय साध्य केले, हा खरा प्रश्न आहे. यापूर्वीच्या नगर परिषदेच्या इतिहासात अशाप्रकारे कधीही थकीत करदात्याची नावे प्रसिद्धी करण्याची वेळ आली नव्हती. नागरिकांना नियमित सेवा-सुविधा पुरविल्या नंतर नागरिक कर भारतात हा नगरपरिषदेचा इतिहास आहे .मात्र सामान्य नागरिकांची वसुलीच्या निमित्ताने बेअब्रू करणे कितपत योग्य आहे असा सवाल अक्कलकोटे यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाने व्यवहार माणुसकी आणि कायद्याची सांगड घालून मार्ग काढण्याची गरज आहे.कालावधी संपलातरी त्याच मंडळीच्या तालावर नगरपरिषदेचा कारभार सुरू आहे. मागील पाच वर्षाच्या कारभारा बरोबर गेल्या तीन महिन्यात झालेल्या आर्थिक बेशिस्त कारभाराची लवकरच महाविकासआघाडी सरकार कडे चौकशी ची मागणी करणार आहे असेही अक्कलकोटे यांनी सांगितले

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.