खाजगी शिक्षण संस्थेपुढे जामीयतुल मदिना हिंद ही संस्था ठरतेय आदर्श.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

जामीयतुल मदिना दावते इस्लामी हिंद याच्यावतीने यावर्षी सण २०२२ मध्ये वार्षिक परीक्षेसाठी जामियतुल मदिना यांच्यावतीने भारतात 11450 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केंद्रीय वार्षिक परीक्षा दिली आहे. यामध्ये मुंबई रिजन सोलापूर झोन शाखा बार्शी मध्ये जामीयेतूल मदिना फैजाने उस्मानएगणी या संस्थेमध्ये यावर्षी 106 विद्यार्थी परीक्षा देत आहेत ,यांची व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे, सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश पत्रिका सॉफ्टवेअर च्या माध्यमातून दिलेली आहे

पूर्ण भारतामध्ये एकच प्रश्नपत्रिका आहे भारतात पाच ठिकाणी उत्तर पत्रिका तपासणी केंद्र आहेत, पूर्ण भारतात परीक्षा वेळ 9 ते 12 अशी ठेवण्यात आलेली आहे उत्तर पत्रिका फेर तपासणीची सुविधा देण्यात आलेली आहे, याचा निकाल पूर्ण भारतात एकाच वेळी प्रसारित करण्यात येईल परीक्षेचा निकाल वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल,

या सर्व परीक्षेचे निरीक्षण जामियतुल मदिना या संस्थेच्या अधिपत्याखाली करण्यात येत आहे याची पूर्ण देखरेख दावते इस्लामी हिंद इंडिया यांच्या वतीने करण्यात येत आहे ,वरील सर्व पेपर परीक्षा सीसीटीव्ही च्या निगराणी मध्ये झाले आहेत या परीक्षेचे निरीक्षण मौलाना सलमान मिसबाई यांच्या निगराणी खाली झाले.

सन 2022 – 2023 जामीयतुल मदिना अलीम कोर्स चे प्रवेश चालू आहेत पुढील नंबर वर संपर्क करावा 7030532526. हाफीज कोर्स चे प्रवेशासाठी पुढील नंबर वर संपर्क करावा 9518330039 ऑनलाइन प्रवेशासाठी संपर्क नंबर 9006063067या नंबर वर संपर्क करून आपला प्रवेश आजच निश्चित करावा असे जामियातुल मदिना हिंद च्या वतीने करण्यात आलेले आहे , जामियेतुल मदिना उस्मानएगनी शाखा बार्शीचे प्रिन्सिपल महेबुब मदनी यांच्या हस्ते स्टार माझा न्युज चे संपादक पठाण यांचा सत्कार करण्यात आला .

ज्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घ्यायचा आहे त्यांचे सर्व शिक्षण विनामूल्य संस्थेमार्फत केले जाईल असे संस्थेकडून सांगण्यात आले.ज्या विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये शाळेमध्ये ऍडमिशन घेऊ शकत नाहीत किंवा वेळ मिळू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना घरी बसून ऑनलाइन पद्धतीने शिकवण्याची ही व्यवस्था संस्थेने केलेली आहे तरी याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे संस्थेच्या प्रिंसिपल यांनी सांगितले. या वेळी मदिना मशिद चे मौलाना हाजी अन्वारुलहक सहाब, जहिरोद्दिन आतार,जमीर शेख महेबुब पांजेशा,गुलाम फरीद,हाजी सकलेन शेख,फिरोज सय्यद साजिद खान अन्सर पठान ,रफिक पठान, व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!