बार्शीमध्ये खंडणीचे सत्र सुरूच!
माजी नगरसेवकाला पैशाची मागणी करत बेदम मारहाण.

Picture of starmazanews

starmazanews



www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी,
तीर्थाक्षेत्र, व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि कृषी क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या बार्शीमध्ये सध्या खंडणीचे प्रकार घडल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अश्या या खंडणीच्या दहशतीमुळे व्यापारी, उद्योजक व सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडणीचे प्रकार मोडीत काढून, त्यांना वेळीच आळा बसविण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी, बार्शीचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी आता चांगलीच कंबर कसली आहे.

बार्शी येथील माजी नगरसेवक सोमनाथ रमाकांत पिसे यांना महिन्याला (20000) वीस हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करत बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

सोमनाथ रमाकांत पिसे हे 11/3/22 रोजी सायंकाळी 6:30 च्या सुमारास, तेलगिरणी चौकातील सुभाष कवडे यांच्या चहाच्या टपरीवर उभा असताना, आरोपी प्रवीण नवनाथ रिकीबे उर्फ (बच्चन) व विकी डबडे या दोघांनी मिळून येऊन, ‘मी मानवी अधिकार याचा अध्यक्ष आहे’. तू बार्शीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मालमत्ता तयार केली आहे असे म्हणत जबर मारहाण केली. पिसे यांना मारहाण करून, तुझा खोटा व्हिडीओ तयार करून, फेसबुकला टाकीन अशी धमकी दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. महिन्याला (20000) वीस हजार रुपये हप्ता म्हणून द्यायचे आणि नाही दिले तर तयार केलेला व्हिडिओ फेसबुकला टाकून, कुठेतरी नेऊन मारून टाकीन. याआधी एक खून पचवीला आहे असं म्हणत, (20000) वीस हजार रुपयाची मागणी करत, आरोपीने जीवे मागण्याची धमकी दिल्याची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

वरील आरोपींवर बार्शी पोस्टे गुरनं.154/2022 भादवी कलम 387, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार हे करत आहेत.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!