गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने


परंडा दि.11येथील पंचायत समिती येथील गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे यांच्यावर दि.10मार्च रोजी दुपारी 1:30 च्या दरम्यान जि.प.प्रा. शाळा इंदिरावस्ती,परंडा येथे बारावीच्या बोर्ड परीक्षाचे कामकाज चालू असताना परीक्षा कार्यालयात येऊन अनिता शिवाजी जगदाळे (विस्तारअधिकारी) व पती शिवाजी जगदाळे यांनी शिवीगाळ करून जबर मारहाण केली व त्यांच्यावरच पोलीस स्टेशन परंडा येथे विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे.सदरील घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक वातावरण गढूळ झाले असून शिक्षण विभागातील कर्मचारी दहशतीखाली वावरत आहेत.



या घटनेचा निषेध परंडा तालुका खाजगी व स्वयंमअर्थ सहाय्यीत शाळांच्या वतीने नोंदवण्यात आला.तहसीलदार, गटविकास अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची व खुळे यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याचे निवेदन देण्यात आले.



यावेळी गोरख मोरजकर, निशिकांत क्षीरसागर, नवनाथ खैरे, संतोष भांडवलकर, संभाजी देवकर, राहूल शिंदे,सूर्यवंशी सर, रणजित घाडगे, सत्यजित घाडगे, सुनिल पडघम,विकास वाघमारे, नलवडे,काशीद, चामवाड, देवकर, देशमुख, शिंदे, पवार, मोरे, वाघमारे आदी उपस्थितीत होते

⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫
परंडा गट शिक्षणाधिकारी श्री. अशोक खुळे साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाचा निषेध व त्यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे,व संबंधितांस तात्काळ अटक करावी,खुळे साहेब यांना जाहिर पाठिंबा देण्यासाठी खाजगी व स्वयंअर्थसहय्यीत शाळांनी मा.तहसीलदार,मा.गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक- परंडा यांना आज निवेदन देऊन घटनेचा निषेध व्यक्त केला !!! ! !
⚫⚫⚫⚫⚫⚫⚫⚫

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!