www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898
प्रतिनिधी :- विजय शिंगाडे
मुक्त वसाहत व तांडावस्ती सुधारच्या
प्रस्तावांना जिल्हा समितीची मंजुरी
उस्मानाबाद,:-सामाजिक न्याय विभाग आणि विजाभज,इमाव व विमाप्र कल्याण विभागातर्फे राज्यात विमुक्त जाती,भटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत जिल्हयात 2021-22 साठी 2780 घरांच्या प्रस्तावास तर वसंतराव नाईक तांडा-वस्ती सुधार योजनेत लोकसंख्येनुसार अनुज्ञेय दायित्वाच्या 70 टक्के निधीच्या प्रमाणातील 161 प्रस्तावांच्या 627.82 लाख रुपयांच्या कामांना तर लोकसंख्येनुसार अनुज्ञेय दायित्वाच्या 30 टक्के निधीच्या प्रमाणातील प्राप्त प्रस्तावापैकी 46 प्रस्तावांच्या 207 लाख रुपयांच्या कामांस जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या उपस्थित झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्हयात लमाण/बजारा समाजाची लोकसंख्या 74 हजार 402 आहे.तर इतर भटक्या विमुक्त जमाहींची संख्या एक लाख 56 हजार 93 आहे.वसंतराव नाईक तांडा,वस्ती सुधार योजनेच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत लोकसंख्येनुसार अनुज्ञेय दीडपट तरतूद 1800 लाख रुपये तर लोकसंख्येनुसार अनुज्ञेय दायित्वाच्या 70 टक्के अंतर्गत 1260 दायित्वाच्या 30 टक्के अंतर्गत 540 लाख रुपये निधी अपेक्षित आहे.लोकसंख्येनुसार अनुज्ञेय दायित्वाच्या 70 टक्के निधीच्या प्रमाणात मंजुरीसाठी उमरगा तालुक्यातील 84,लोहारा तालुक्यातील 26,भूम तालुक्यातील 30,परंडा तालुक्यातील 14 तर वाशी तालुक्यातील सात प्रस्ताव अशा एकूण 161 प्रस्तावांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.यासाठी 627.82 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे.लोकसंख्येनुसार अनुज्ञेय दायित्वाच्या 30 टक्के निधीच्या प्रमाणात 46 प्रस्ताव मंजुर करण्यात आले.यात उमरग्याचे 35 तर लोहाऱ्याचे 11 प्रस्ताव आहेत.यासाठी 207 लाख रुपयांचा निधी आहे.या सर्व मंजुर प्रस्तावासाठी 834.82 लाख रुपयांचा निधी आहे.
जिल्हयात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना 2021-22 साठी आठही तालुक्यांतून 3711 प्रस्ताव प्राप्त झाले होते.यात उस्मानाबाद 774,तुळजापूर 539,उमरगा 355,लोहारा 136,कळंब 646,वाशी 563,भूम 225 तर परंडा 473 प्रस्ताव होते.तालुकास्तरीय समितीकडून मार्च 2022 पर्यत प्राप्त झालेले एकूण प्रस्ताव 3389 होते.त्यात उस्मानाबाद 774,तुळजापूर 217,उमरगा 355,लोहारा 136,कळंब 646,वाशी 563,भूम225,तर परंडा 473 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.तथापि,तालुकास्तरीय समितीने 322 प्रस्तावांची शिफारस केली नाही.
जिल्हास्तरिय समितीने प्रपत्र “ड” मध्ये असलेल्या 1338 प्रस्तावांना तर प्रपत्र “ड” मध्ये नसलेल्या 1442 प्रस्तावांतील घरांच्या कामांना मंजुरी दिली आहे.931 प्रस्ताव अपात्र ठरले आहेत.या बैठकीत जिल्हयात 2780 मुक्त वसाहतच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.प्रपत्र “ड” मध्ये असलेले तालुकानिहाय प्रस्ताव असे उस्मानाबाद 507,तुळजापूर 83,उमरगा 87,कळंब 498,भूम 16,आणि परंडा 147,तर प्रपत्र “ड”मध्ये नसलेले तालुकानिहाय प्रस्ताव असे-उस्मानाबाद 267,तुळजापूर 136,उमरगा 32,लोहारा 4, कळंब 113,वाशी 434,भूम 150 आणि परंडा 308 आहेत.प्रपत्र “ड” मध्ये नसलेल्या प्रस्तावांची रॅडम पध्दतीन तपासणी करुन अहवाला सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी दिले आहेत.
या बैठकीत जिल्हयातील ऊस तोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबतही चर्चा झाली जिल्हयात प्राप्त माहितीनुसार 21 हजार 134 ऊस तोड कामगार आहेत.यात तालुका निहाय असे उस्मानाबाद 3367,तुळजापूर 3730,उमरगा 1841, लोहारा 1749,कळंब 3413,भूम 4741, परंडा 1459, आणि वाशी 534.जिल्हयातील गट विकास अधिकारी यांच्याकडून ही माहिती एकत्रित करण्यात आली आहे.गेल्या तीन वर्षात ऊसतोड कामगार म्हणून काम केलेल्या सर्व कामगारांची नोंद करुन त्यांना ग्रामसेवकांमार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे.यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्हयात समिती स्थापन करण्याचे पत्र समाज कल्याणचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिले आहे.
याबैठकीत जिल्हयातील गावांची,वस्त्यांची आणि रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून नवीन नावे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.जिल्हयात विजाभज,विमाप्र जातींची नावे असलेल्या वस्त्यांची संख्या 382 आहे.यात उस्मानाबाद 93, तुळजापूर 46, कळंब 63, भूम 35, परंडा 11, उमरगा 136, लोहारा 6, आणि वाशी 22.जिल्हयात नगर पालिका क्षेत्रातील वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदल्याबाबतची संख्या 40 आहे.यात शहर निहाय संख्या अशी उस्मानाबाद 6, तुळजापूर 6,नळदुर्ग 3, उमरगा 5,मुरुम 5 कळंब 3, भूम 4, परंडा 3, वाशी 3, तर लोहारा 2, अशी संख्या आहे.
या बैठकीस जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,समाज कल्याचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत,जि.प.चे जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले,जिल्हयातील आठही पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.