सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी येथे दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न .

Picture of starmazanews

starmazanews

Starmazanews.com प्रतिनिधी :- श्री प्रभाकर जाधव सर तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद.

. तामलवाडी:- दि.2 मार्च येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे शैक्षणिक वर्ष 2021- 22 इयत्ता दहावी व बारावी कला या वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तामलवाडी चे संस्थापक संचालक मल्लिकार्जुन मसुते हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे माजी विद्यार्थी व सध्या लातूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ वैभव कवडे व संगमेश्वर महाविद्यालय लातूर येथे कार्यरत असलेले जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा श्रीकांत माळी संस्थेचे अध्यक्ष बसवराज मसुते उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील सचिव यशवंत लोंढे ,संचालक बाळासाहेब जगताप, गोरख माळी, अब्बास पटेल , विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे गटसचिव सुधाकर लोंढे ,पालक चंद्रकांत घोडके, नागनाथ मसुते ,प्राचार्य सुभाष जाधव, पर्यवेक्षक गणेश हलकरे, माजी परिवेक्षक काशिनाथ रामपुरे, यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी चैत्राली घोडके, श्रीशैल मसुते, पूजा जाधव ,स्नेहा कदम या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत साळुंखे यांनी केले .तर याप्रसंगी डॉ. वैभव कवडे यांनी वैद्यकीय क्षेत्राचा मार्ग कसा अवलंबावा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर जीवशास्त्राचे प्रा श्रीकांत माळी यांनी ” पुढील भावी काळात विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा तसेच ज्याप्रमाणे एखादा तलाव तयार केल्यानंतर पावसाचे पाणी एकत्रित केले जाते व त्या तलावाच्या परिसरातील सर्व शेती सुजलाम सुफलाम होते लोक सधन व सुखी समाधानी होतात. त्याचप्रमाणे या तामलवाडी येथील सरस्वती परिवाराने मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र याच्या सरहद्दीवर सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून एक ना एक ज्ञानसागर तयार केला व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य केले व त्यातूनच अनेक हिरे तयार झाले”. या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे, चंद्रकांत साळुंखे , चांगदेव सावळे, प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, लक्ष्मण पाटील ,सुहास वडणे ,महादेव माळी, गिरीश जाधव ,योगेश राऊत ,महादेव मसुते, बालाजी साठे ,विनोद कुंभार प्रशांत चुंगे ,श्रीगणेश स्वामी ,बालाजी रणसुरे ,महिला शिक्षिका शहीदा पिरजादे ,मनीषा गिरे ,विठाबाई पाटील ,मनीषा सावंत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वडणे यांनी तर चांगदेव सावळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

www.starmazanews.com मुख्य संपादक : रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!