परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दि . 30 जून 2025 जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव व शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परंडा अंतर्गत आर्य चाणक्य कौशल विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १२ खाजगी क्षेत्रातील नामांकित उद्योजक आस्थापना यांच्याकडील एकुण 212 पदे भरण्यासाठी पात्र व नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता . या रोजगार मेळाव्यामध्ये निवडून आलेल्या आणि निवड प्रक्रियेमध्ये अनेक सुशिक्षित बेकार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत . त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध झाला .या महाराष्ट्र शासनाच्या उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे त्याची मर्यादा आणखीन सहा महिने वाढवून दिल्यामुळे नियुक्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे .असे मत सहाय्यक आयुक्त संजय गुरव यांनी व्यक्त केले .अशा या रोजगार मेळाव्यामध्ये शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला . या सत्कार समारंभाच्या प्रसंगी सहाय्यक आयुक्त संजय गुरव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्यांच्या व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते महाविद्यालयातील सर्व कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने स्टाफ सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे यांची उपस्थिती होती . प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाणे कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा किरण देशमुख कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्या सह महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ अरुण खर्डे यांनी केले तर डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आभार मानले .


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.