स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परांडा प्रतिनिधी दिनांक 28 नीट व जेईई परिक्षेत उज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी कु. मुफज्जल अबरार पठाण याला ६०२ आणि कु. आदित्य आनंद मोरे याला ५५४ गुण मिळाले. तसेच कु. भावना श्यामराज शिंदे हिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून बी.एस्सी. रसायनशास्त्र विषयात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या..
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. जहीर चौधरी, परंडा न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस रामकृष्ण घोडके, ता. उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, मेजर महावीर तनपुरे, डॉ. आनंद मोरे, डॉ. अबरार पठाण, मिलिंद शिंदे, धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, किरण कवटे, महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.