परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा येथील संत बाळु मामा मंदिर येथे दिनांक 25 /6/2025 बुधवार रोजी दर्श अमावास्या निमित्त ब्रह्मांडनायक देव बाळूमामा मंदिर परंडा येथे मामांचा भंडारा उत्सव सोहळा संपन्न झाला. पहाटे श्रींना महाभिषेक होऊन आरती झाली. सकाळी 8 ते 12 श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ सोनगीरी भोंजा कुंभेजा रुई दुधी खासगाव करंजा कात्राबाद ढग पिंपरी पंचक्रोशीतील भजन गायक वारकरी महिला व पुरुष गायक वादक बहुसंख्येने मंडळी उपस्थित राहून आपली भजन सेवा सादर केली या उत्सवामध्ये गायनाचार्य सतीश महाराज सूर्यवंशी यांनी संत मुक्ताईंचा अभंग
वरी भगवा झाला नामे
अंतरी वष केला कामे
त्याला म्हणू नये साधु
जगी विटंबना बादू
व नंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग
पैल तोगे काऊ कोकता हे शकुन गे माय संगता हे
उड उड रे कावु
तुझे सोन्याने मडविन पावु
पाहुने पंढरी रावु घरा कै होती. ही माऊलींची विरहाणी पर अभंग आपल्या विशेष शैलीतून गोड मधुर आवाजातून सादर करून संत मुक्ताईंचे शब्द व माऊली ज्ञानोबारायांचे शब्द आपल्या गायनातून सर्व भाविक भक्त श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचवून सर्वांना मंत्रमुग्ध करूण ब्रह्म रसाचा आनंद दिला. हभप विजू महाराज खंडागळे हभप शहाजी महाराज सुतार हभप बळीराम महाराज कोळी हभप काकासाहेब महाराज गवारे हभप मुरलीबापू महाराज बोराडे अंकुश जमदाडे भरत देवकर घाडगे महाराज मेजर परमेश्वर बप्पा महाराज नेटके मांढरे महाराज दगडू महाराज कोकाटे जनार्दन नेटके उत्तरेश्वर नेटके रमेश महाराज जाधव. आनंद बारस्कर पो. पाटील. म्हेत्रे साहेब पोलीस. राजाभाऊ पाटील रुई. हभप गोरख महाराज शिंदे सोनगिरी. या सर्व गायक महाराजांचा गायनाचा उत्कृष्टपणे कार्यक्रम सादर झाला.पंचक्रोशीतील सर्व महीला व पुरुष भजनी मंडळींनी आपले अभंग गायनातून सर्व भाविक भक्तांना मंत्र मुग्ध केले.
अन्नदातेः चहा नियोजन श्री गणेशसिंह सद्दीवाल. कन्या आंबील नियोजन श्री. अनंतसिंह सद्दीवाल. महाप्रसादाचे अन्नदातेः श्रीमती राजश्री छगन गणगे.
भाजीपाला नियोजन श्री बाळासाहेब पाडुळे रा. खासापुरी. पाणी जार नियोजनः अॅड. श्री भालचंद्र औसरे सर. नागनाथ मिरघने 50 किलो गहू. सौ आशा ताई कांबळे व विशाखा सुरवसे यांनी पितळी मेंढी माऊली व खंडोबा मूर्ती मामांच्या चरणी अर्पण केले. लक्ष्मीबाई बबन डाके यांनी 25 स्टील भोजन थाळी श्री चरणी अर्पण केले. श्री राजेंद्र मदने मेजर बापू रुपनवर भागवत डडमल नागनाथ देवकते जगन्नाथ मदने दत्ता लिमकर नागेश मदने करण भांगे या सर्व भाविक भक्तांची खूप सेवा घडली. महिलांनी चपाती बनवण्यासाठी खूप सेवा केली.ओंकार साऊंड सिस्टीम खासापुरी नं 1. सर्व भाविक भक्तांनी मामांच्या दर्शनाचा भजनाचा व महाप्रसादाचा आनंदाने लाभ घेतला. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त गायक वादक मंदिर सेवकरी अन्नदातेः देणगीदार येणारे सर्व भक्त यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद. ब्रम्हांडनायक देव बाळूमामांच्या नावानं चांगभलं जय जय विठू माऊली जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏आपले नम्रः ब्रम्हांडनायक देव बाळूमामा मंदिर परंडा सर्व भक्त परिवार व ग्रामस्थ 🙏केशरताई वैरागे



Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.