स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी (ता. १४ जून २०२५) – परंडा शहरात सतत होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होणे, वेळेवर वीजबिले न मिळणे यासारख्या समस्या वारंवार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता (AC) आडे साहेब हे परंडा दौऱ्यावर आले असता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांची भेट घेतली.
शिवसेना युवा नेत्यांची ठाम भूमिका
या भेटीत शहरातील लाईट संबंधित समस्या मांडण्यात आल्या. सतत वीज खंडित होणे, वीजबिल वितरणात होणारा विलंब अशा अनेक तक्रारींवर विश्वजित पाटील यांनी आडे साहेबांना जाब विचारला.
८ दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आदेश
या संवादात AC आडे साहेब यांनी शहरवासीयांना आश्वस्त करत सांगितले की, “यापुढे अशा समस्या उद्भवणार नाहीत.” तसेच त्यांनी संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना येत्या ८ दिवसांत सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
बैठकीस शहरातील नेते व कार्यकर्ते उपस्थित
या वेळी शहरप्रमुख रईस मुजावर, ऋषी भराटे, हुसेन शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहरवासीयांनी या निर्णयाचे स्वागत करत महावितरणच्या कार्यक्षमतेबाबत अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.