“क्या हुवा तेरा वादा?” – सरकारच्या अपयशावर शिवसेनेचा परंडा येथे जोरदार सवाल

Picture of starmazanews

starmazanews



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून परंडा नगरपरिषदेला निवेदन; सरकारच्या खोट्या वचनांची आठवण करून दिली


सरकारच्या अपूर्ण वचनांवर शिवसेनेचा हल्लाबोल

स्टार माझा न्यूज परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने .
परंडा शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने “क्या हुवा तेरा वादा?” या मोहिमेअंतर्गत सरकारने केलेल्या वचनांची पूर्तता का झाली नाही, याबाबत जोरदार सवाल उपस्थित करण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.




अपूर्ण वचने – सरकारची फसवणूक?

या निवेदनात खालील वचनांची आठवण करून देण्यात आली –

1. शेतकऱ्यांची कर्जमाफी


2. शेतकरी सन्मान योजनेतील १५,००० रुपये


3. बहिणीला २१०० रुपये देण्याचे आश्वासन


4. ४५,००० पानंद रस्त्यांचे बांधकाम


5. SGST परतफेड स्वरूपात अनुदान


6. वृद्ध पेन्शन धारकांना २१०० रुपये


7. शेतीला २४ तास वीज


8. ‘हर घर जल – हर घर छत’ योजनेची अंमलबजावणी


9. मराठवाडा वॉटर ग्रीन प्रकल्पास मंजुरी







मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

ही सर्व मागणी नगरपरिषद परंडाचे मुख्याधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. या निवेदनाच्या माध्यमातून जनतेच्या भावना व सरकारच्या अपयशाबाबत स्पष्ट संदेश देण्यात आला.





नेत्यांची उपस्थिती – संघटनबळाचे दर्शन

या प्रसंगी शहरप्रमुख रईस मुजावर, माजी उपनगराध्यक्ष इस्माईल कुरैशी, नगरसेवक मैनुद्दीन तुटके, मन्नान बासले, शब्बीर पठाण, ज्येष्ठ नेते जनार्धन मेहेर, डॉ. अब्बास मुजावर, सोशल मीडिया समन्वयक प्रशांत गायकवाड, युवा सेना शहरप्रमुख कुणाल जाधव यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.





शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग

दत्तात्रय धनवे, तुकाराम गायकवाड, मधुकर गायकवाड, संतोष गायकवाड, बाबुराव गायकवाड, रफिक मुजावर, लक्ष्मण गरड, सचिन शिंदे, बाबा कुरैशी, सत्तार पठाण, ताया जिकरे, लतीफ कुरैशी, मजहर दहेलूज, सलीम मुजावर, औदुबर पाटील, राजा पाटील, अशोक कडबणे, राजू कांबळे, जुल्फेकार काझी, रविकिरण चैतन्य, अभिषेक गायकवाड, सादिक शेख, साबेर शेख, शरद डोरले, पृथ्वीराज पाटील, मयूर वाघमारे, सुरेश वाघमारे, हुसेन शेख, तौफीक पठाण, साकीब मुजावर आदी शिवसैनिकांची उपस्थिती नोंदवली गेली.





जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर

परंडा शहरात शिवसेनेने एकात्मिकपणे आंदोलन करत सरकारकडून वचनपूर्तीची मागणी केली. शिवसैनिकांचा निर्धार – “वादे के अनुसार हक्क मागणारच!”



बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!