परंडा, प्रतिनिधी – गोरख देशमाने.
परंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरा वस्ती येथे कार्यरत असलेले शिक्षक आप्पासाहेब बल्लाळ यांना पर्यावरणप्रेमी शिक्षक म्हणून परंडा तालुक्यात विशेष ओळख मिळाली आहे. आपल्या 21 वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध शाळांमध्ये वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे अनोखे कार्य स्वखर्चाने केले आहे.
प्रत्येक शाळेचे रूपांतर सुंदर बगिचामध्ये
बल्लाळ सरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरे वस्ती, जेकटेवाडी आणि इंदिरा वस्ती परंडा येथील शाळांमध्ये स्वतःच्या खर्चातून बागकाम केले असून, या शाळांमध्ये विविध प्रकारची फुलझाडे बहरलेली पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व कळावे यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत.
घरी तयार केलेली नर्सरी – इतरांसाठीही प्रेरणा
आपल्या राहत्या घराजवळ त्यांनी खासगी नर्सरी तयार केलेली असून, तालुक्यातील शिक्षक व शेतकऱ्यांना झाडांचे मोफत किंवा अल्पदरात वितरण केले जाते. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणारा आणि पर्यावरण संवर्धनास चालना देणारा आहे.
पर्यावरण दिनानिमित्त गौरव
आज, 5 जून पर्यावरण दिनानिमित्त गटशिक्षणाधिकारी सूर्यभान हाके सर, विविध शिक्षक संघटना, सहकारी शिक्षक आणि परिसरातील नागरिक यांनी आप्पासाहेब बल्लाळ सरांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.