पंचायत समिती परंडाने घेतली गरुडझेप !

Picture of starmazanews

starmazanews


विभागातून प्रथम १०० दिवसांच्या मुख्यमंत्री प्रशासकीय सुधारणा मोहिमेअंतर्गत मराठवाडयातील ७५ तालुक्यामधून मारली बाजी !
परांडा (प्रतिनिधी) गोरख देशमाने
परंडा, ता.४ (प्रतिनिधी)  १०० दिवसांच्या मुख्यमंत्री प्रशासकीय सुधारणा मोहिमेअंतर्गत गुणानुक्रमे परंडा पंचायत समिती कार्यालयाचा मराठवाडा विभागामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. त्याअनुषंगाने ता. ४ जून रोजी पंचायत समिती सभागृहामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.


दि.३० मे रोजी  छत्रपती  संभाजीनगर येथे झालेल्या समारंभात विभागाचे आयुक्त दिलीप गावडे यांचे हस्ते  प्रशिस्तीपञक देऊन गटविकास अधिकारी मोहन राउत, प्रशासन अधिकारी अजयकुमार माळी, कृषी विस्तार अधिकारी सुरज बोडखे यांना गौरविण्यात आले.   याप्रसंगी मराठवाडा विभागातील सर्व जिल्हयाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व निमंत्रित यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम राबविला होता. यामध्ये उत्कृष्ट कामकाज करणा-या विभागांना प्रथम, व्दितीय, तृतीय असे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यामध्ये पं. स. परंडा कार्यालयाचा मराठवाडा विभागामध्ये प्रथम क्रमांक आला आहे. यासाठी पंचायत समिती परंडा येथे डॉ.मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली प.स. गटविकास अधिकारी अमोल ताकभाते  यांनी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले. डॉ.मैनाक घोष यांनी परंडा पंचायत समितीसाठी शाश्वत विकासाअंतर्गत केलेल्या कामांचे सादरीकरण करण्याची जबाबदारी प्रशासन अधिकारी अजयकुमार माळी यांना दिली होती. त्यानुसार त्यांनी संपूर्ण सादरीकरण हे शाश्वत विकास साध्यण्यासाठी राबविलेले विविध उपक्रमांचे सादरीकरण तयार केले होते. ते इतर विभागांपेक्षा वेगळेपणा असल्याने विभागीय आयुक्त यांनी पं.स. परंडा कार्यालयास ७५ तालुक्यांमधून प्रथम क्रमांक दिला.



अजयकुमार माळी हे युनेस्कोची सल्लागार संस्था इकोमॉसचे सहयोगी सदस्य म्हणून शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात.  या कामासाठी तत्कालीन गट विकास अधिकारी मनोज राउत, अमोल ताकभाते, सध्याचे गट विकास अधिकारी मोहन राउत, यांच्यासह बाबू पवार, रंजना कदम, श्री तांबारे, आनंदराव निंबाळकर, कृ.अ. वास्ते, श्रीशैल कोटे, विकास सूर्यवंशी, सुरज बोडखे, दादू दखनी, प्रफुल्ल गोडगे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी एक टीम म्हणून काम करून मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक मिळविला. यासाठी डॉ.मैनाक घोष यांनी सर्वांचे अभिनंदन करून याबाबत पुढील कामाबाबत असेच सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!