ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवत बार्शीचे डॉ सारंग खडके यांनी गाठली यशाची शिखरं.

Picture of starmazanews

starmazanews



✦ वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च पदवीकडे यशस्वी वाटचाल ✦

बार्शी तालुक्यातील सुपुत्र डॉ. सारंग शरद खडके यांनी वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. त्यांनी Provisional NEET Superspeciality Counseling 2024 च्या पहिल्या फेरीत यश मिळवले असून त्यांना Breach Candy Hospital, मुंबई येथे  DNB,SS Nephrology या शाखेसाठी प्रवेश मिळाला आहे.

✦ बार्शीचा अभिमान – एक सुपुत्राचा मोठा टप्पा पार ✦

या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुकाची लाट आहे. बार्शी शहर व परिसरातील लोकांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की आपल्याच गावातील डॉक्टर राष्ट्रीय स्तरावरील नामांकित रुग्णालयात वैद्यकीय सेवेसाठी निवडले गेले आहेत.

सातत्याने मिळणारी उच्च मानांकने ✦

चि. डॉ. सारंग शरद खडके यांनी वैद्यकीय क्षेत्रात उच्च दर्जाची कामगिरी करत, नेहमीच आपले नाव उजळवले आहे. अशीच वरचेवर वैद्यकीय क्षेत्रातील उच्च मानांकने मिळवत राहो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना.

✦ बार्शीकरांकडून मनःपूर्वक शुभेच्छा ✦

या यशस्वी टप्प्यानंतर बार्शी शहरातील नागरिक, डॉक्टर्स, शिक्षक, मित्रमंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून डॉ. सारंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

✦भावी वाटचालीसाठी शुभेच्छा ✦

‘स्टार माझा न्यूज’ परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. असेच यश त्यांनी भविष्यातही मिळवत जावो, हीच सदिच्छा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!