स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांचे तातडीचे मदत कार्य….! .
परंडा-सोनारी रोडवर दि.२८ मे रोजी रात्री ११ : ३० वा. सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या ई-रिक्षा व अज्ञात वाहनाच्या धडकेत वाटेफळ येथील भांडवलकर यांच्या दूध डेअरी येथील वाहन चालक एम. सागर ( रा. ओडिशा ) जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांची तातडीची मदत केली.यावेळी रणजित दादांनी पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. विश्वेश्वर कुलकर्णी यांना अपघातांची माहिती दिली. यावेळी धैर्यशील ( मामा) पाटील, साबेर भाई मुजावर, तोफिक मुजावर व उपस्थितांच्या मदतीने जखमी वाहन चालकाला बाहेर काढण्यात आले. चालकाला उजव्या हाताला जखम झाली आहे. पोलिस कर्मचारी क्षीरसागर व भोपे तात्काळ हजर झाले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी रवाना केले.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.