परांडा प्रतिनिधी – गोरख देशमाने | स्टार माझा न्यूज.
खरीप पेरणीच्या तोंडावर संप!
१९ मे रोजी महाराष्ट्र राज्यातील कृषी सहाय्यक बंधू-भगिनींनी संपाचं हत्यार उपसले असून, त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारेच रस्त्यावर उतरल्याने आता बळीराजाला सल्ला देणार तरी कोण? असा प्रश्न ग्रामीण भागात विचारला जात आहे.
निवेदनाद्वारे निवेदन – कृषी अधिकाऱ्यांना मागण्या सादर
धाराशिव येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. रविंद्र माने यांना परांडा तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी निवेदन देत आपली मागणी मांडली. राज्य सरकारकडून विविध मागण्या पूर्ण न झाल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
रोजगार हमी आणि जलतारावर परिणाम
या संपामुळे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या फळबाग प्रकल्पांवरही विपरीत परिणाम होत आहे. विशेषतः धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या ‘जलतारा’ योजनेवर देखील या संपाचा परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकऱ्यांची भावना – सरकारने तातडीने लक्ष घालावे
कृषी सहाय्यकांचे प्रश्न रास्त असून, त्यांच्या मागण्या मान्य करून हा संप तातडीने मिटवावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांनी याची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा खरीप हंगाम संकटात सापडण्याची भीती आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.