मा.आ.राजाभाऊ राऊत यांच्या पाठपुराव्याला यश; वैरागकरांना मिळणार आरोग्य सुविधा

Picture of starmazanews

starmazanews

वैराग येथे ग्रामीण रुग्णालयासाठी २.४५ हेक्टर जागेचा प्रश्न निकाली; लवकरच कामाला सुरुवात



वैराग (ता. बार्शी) येथे प्रस्तावित ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयासाठी महायुती सरकारने विशेष बाब म्हणून मंजुरी दिली होती. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा संपादनाचा प्रश्न प्रलंबित होता.
राजकीय इच्छाशक्ती व सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर या विषयाला गती मिळाली असून, वैरागकरांच्या आरोग्यासाठीची महत्वपूर्ण पायरी पार झाली आहे.



जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत जागेची मंजुरी
माजी जिल्हा परिषद सदस्य मा. राजाभाऊ राऊत यांनी वारंवार प्रशासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळेच या कामात प्रगती झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी वैराग येथील शासकीय गट नंबर ४२२/२ मधील तब्बल २ हेक्टर ४५ आर जागा संपादित करण्याचे आदेश दिले आहेत.



रुग्णालयाची उभारणी लवकरच सुरू होणार
या आदेशानंतर लवकरच जागा संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु होईल. हे रुग्णालय वैराग भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.



सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णालय
सदर ग्रामीण रुग्णालयामध्ये खालील सुविधा असणार आहेत:

जनरल वॉर्ड

पुरुष व महिला वॉर्ड

सर्जिकल ओपीडी

एक्सरे रूम

पॅथोलॉजी लॅब

ऑपरेशन थिएटर

मेडिकल स्टोअर

क्रिटिकल केअर युनिट


या सर्व सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे वैराग व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांना बार्शी किंवा सोलापूरला न जाता स्थानिक पातळीवर उपचार घेता येणार आहेत.



नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
या निर्णयामुळे वैराग परिसरात समाधानाचे वातावरण असून, वैरागकरांनी माजी सदस्य राजाभाऊ राऊत यांचे आभार मानले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.




बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:
संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!