स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 /9408749898
परांडा प्रतिनिधी दि.07/05/2025 रोजी परंडा तालुक्यातील क्षयरोग मुक्त 20 पात्र ग्रामपंचायतीचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परंडा तसेच पंचायत समिती कार्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निंभोरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी माननीय श्री.राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह परंडा येथे तालुक्यातील 20 पात्र ग्रामपंचायतीचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाच्या वेळी धन्वंतरीच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
टीबी मुक्त ग्रामपंचायत गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद मोरे यांनी केले.
यावेळी डॉ. निंबोरकर सर यांनी कार्यक्रमास उपस्थित यांना क्षयरोग विषयी सखोल माहिती देऊन क्षयरोगाबद्दलची जनजागृती संदर्भात मार्गदर्शन केले.

तसेच गटविकास अधिकारी माननीय श्री. राऊत साहेब यांनी तालुक्यातील उपस्थित सरपंच, ग्रामविकास अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका यांना टीबी मुक्त ग्रामपंचायत उद्दिष्ट नुसार व तालुक्यातील जास्त सिल्वर, गोल्ड, मेडल साठी पात्र कशा ठरतील याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच आयुष्यमान कार्ड दिलेल्या उद्दिष्टानुसार पूर्तता केलेल्या आशा स्वयंसेविका ग्रामसेवक, आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा सत्कार करून गुणगौरव करण्यात आला. यावेळी श्री. आयाज शेख, डॉ. विकास पवार, श्री. रामचंद्र झिंगे आणि श्री. दत्तात्रय आडसुळ यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवलली.

तालुक्यातील टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायत
1)आसू, 2)कपिलापुरी, 3)खासगाव, 4)देवगाव खु. 5)लोणी, 6)लोहरा.7)रुई.
8)जवळा, 9)वाकडी, 10)टाकळी 11)राजुरी, 12) कांदलगाव. 13)आलेश्वर, 14)कौडगाव, 15)पाचपिंपळा, 16)डोमगाव -1
17)मुगाव, 18)शेळगाव, 19)जेकटेवाडी, 20)उंडेगाव. या 20 ग्रामपंचायतींना गुणगौरव सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संपन्न झाला.

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.