परांडा पंचायत समिती शौचालय बंद असल्याने महिलांची प्रचंड गैरसोय.

Picture of starmazanews

starmazanews

“असून अडचण नसून, खोळंबा” म्हण खरी ठरली; शौचालय असूनही महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ

बांधलेलं शौचालय बंद, महिलांना त्रास
परांडा (ता. परांडा प्रतिनिधी गोरख देशमाने) – पंचायत समितीच्या हद्दीत दीड ते दोन वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी शौचालय बांधण्यात आले. मात्र, “असून अडचण नसून, खोळंबा” ही म्हण इथे तंतोतंत लागू होते, कारण हे शौचालय आजपर्यंतही वापरात आणले गेलेले नाही.

महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ
शौचालय उपलब्ध असूनही ते बंद असल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना आणि इतर महिलांना दररोज उघड्यावर जाण्याची वेळ येते. कार्यालयीन वेळेत ही स्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे. शासनाने शौचालय उभं केलं असलं, तरी ते वापरात नसल्यामुळे त्याचा उपयोग शून्य आहे.

प्रशासनाकडून दुर्लक्ष?
हे शौचालय नेमके का बंद आहे? कोण जबाबदार? या प्रश्नांची उत्तरे अद्याप प्रशासनाकडून मिळालेली नाहीत. नागरिक व महिला कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्षच झालं आहे.

तातडीने शौचालय सुरू करण्याची मागणी
परिस्थिती पाहता तातडीने शौचालय दुरुस्त करून वापरात आणावं, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. महिलांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज
स्थानिक सामाजिक संघटनाचे तीव्र नाराजी व्यक्त केले आहे या प्रकरणाची तात्काळ  दखल घ्यावी तसेच , प्रशासनावर शौचालय सुरू करण्यासाठी  दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “महिला सक्षमीकरणाच्या नुसत्या घोषणा नव्हे, तर पायाभूत सुविधा वेळेवर मिळणं आवश्यक आहे,” असा सूर नागरिकांमध्ये आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!