पहलगाम दहशतवादी हल्ला: “घरी एकटाच कमावणारा होता” – हुसैन शाहच्या आईचे दुःख काळीज पिळवटून टाकणारे
जम्मू-काश्मीर | पहलगाम
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात बासरन घाटीत टट्टू चालवणारा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा सय्यद हुसैन शाह या युवकाचा मृत्यू झाला. तो घर सोडून कामासाठी आलेला होता. त्याच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला, त्यात बहुतेक पर्यटक होते. हुसैन शाह देखील त्यातच एका गोळीचा बळी ठरला.
अनंतनाग येथील हुसैन शाहच्या वडिलांनी सांगितले की, हुसैन रोजच्या प्रमाणे बासरन घाटीत टट्टू चालवण्यासाठी गेला होता. हल्ल्याची बातमी समजताच घरच्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता. सायंकाळी 4.30 च्या सुमारास फोन सुरू झाला, मात्र कोणीही तो उचलत नव्हते. शेवटी पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दाखल केला गेला. नंतर कळाले की हुसैनला गोळी लागली आहे.
घरच्यांनी तात्काळ पहलगामकडे धाव घेतली आणि तिथे त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली.
“हुसैन निर्दोष होता, त्याला का मारलं?”
घरच्यांनी सांगितलं की, घरात कमवणारा तोच एकटा होता. बाकी सारे लहान आहेत. आई अजूनही त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. रडता रडता तिचं काळीज तुटतं आहे. “माझा मुलगा परत येणार नाही, मीच चुकले, त्याला बाहेर का जाऊ दिलं?” असं म्हणत ती स्वतःलाच दोष देत आहे.
सरकारकडे एकच मागणी – न्याय मिळावा
हुसैनच्या कुटुंबियांनी सरकारकडे न्यायाची मागणी केली आहे. “आता मागावं तरी काय? ज्याच्यावर घर चालत होतं, तोच गेला. फक्त एवढीच विनंती की या घटनेचा निषेध व्हावा आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी.”
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: संपादक रियाज पठाण – 9405749898 / 9408749898

Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.